जपान मध्ये दोन महिन्यापूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे पूर्ण जग हादरले होते . जपान त्यातून बाहेर निघू पाहत आहे तोच अणुऊर्जेचे संकटाने मागून झडप घातली. हे सर्व पाहता प्रत्येक देश स्वतःला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू पाहत आहे.
त्यातच भारताची भूमिकाही तेव्हडीच महत्वाची... जपानच्या आजच्या परिस्थितीला पाहता जैतापूर प्रकल्पावर सरकारची बाजू काय असावी याचे तर्क वितर्क लोकांनी किंबहुना विरोधी पक्षाने जे केले ते न सांगितलेलेच बरे आणि यामुळेच हा वाद लोकांसमोर यायला वेळ लागला नाही पण या सर्व तर्क वितर्कामध्ये दूर फेकला गेला तो तिथला स्थानिक नागरिक. त्याची भूमिका काय असावी याचा विचार पडताच काल परवा सुरु झालेल्या जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलनाचे पेटक रूप घेतल्याची बातमी कानावर येवून धडकली.
नाटे गावातील ग्रामस्थांनी तेथील पोळीचे ठाण्याला लावलेली आग..तरबेज नावाच्या आंदोलकांचे गोळी लागून झालेला मृत्यू, नंतरची दगडफेक जाळपोळ .....बाप रे बाप ..... या सर्वांमध्ये दिसून आला तो नागरिकांचा उद्रेक, राग. जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलन तेव्हडेच महत्वाचे होते जेव्हडे अन्नाचे भ्रष्टाचार विरोधी... मग याप्रकरणात सरकारची, भूमिका ऐव्हाडी निश्काल्जीपानाची कशी काय ?
नाटे पेटण्याचे खरे कारण काय ? ग्रामस्थांचा पोलिसांवर असणार राग ? कि या प्रकल्पामुळे धोक्यात येणारी मासेमारी ? प्रकल्पामुळे जैतापुरचे फुकुशिमा व हिरोशिमा होण्याची भीती?
कारण काहीहि असो. पण हि आग कोठपर्यंत पसरत जाईल..तो पर्यंत अजून किती निष्पाप तरबेज यात होरपळून निघतील ....या आगीवर राजकारण्यांनी आपली भाकरी भाजण्याची सुरुवात या आधीच सुरु केली आहे.पण यामुळे खीळ बसली आहे ती जैतापूर प्रकल्पाच्या निर्णयाला जो घेणे सरकारला अजूनही अवघड जागीचे दुखणे म्हणून घेता येत नाही.
लवकरच यावर निर्णय घेणे आवश्यक आहे नाहीतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाशिवाय जैतापुरचे हिरोशिमा आणि फुकुशिमा होण्यास वेळ लागणार नाही ......